अनिवार्य कागदपत्रांची सूची

  1. www.pwdpunecircle.com या संकेतस्थळावर भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट प्रत.
  2. परीक्षा फी भरलेल्या चलनाची मूळ प्रत.
  3. भारतीय नागरीक व महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेले प्रमाणपत्र
  4. मागासवर्गाच्या निवड झालेल्या उमेदवारांनी मूळ जात प्रमाणपत्र व जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र
  5. शैक्षणिक पात्रता :- जाहिरातीत नमूद केलेल्या अर्जासोबत सादर करणेत आलेल्या शैक्षणिक पात्रता पृष्ठर्थ आवश्यक व अनुषंगिक प्रमाणपत्रे व कागदपत्रे
  6. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग आणि इतर मागास प्रर्व यांच्यासाठी आरक्षण अधिनियम – 2001 (सन 2004 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.8) मधील कलम 4(2) (दोन) खालील परंतुका अन्वये उन्नत व प्रगत गटाचे क्रीमीलेयर तत्व, विजा –अ, भज- ब, भज- क , भज-ड विमाप्र व इमाव या प्रवर्गांना लागू करण्यात आलेले आहे. त्यानुसार शासन परिपत्रक सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय विभाग, क्र् सीबीसी10/2006/प्र.क्र. 15/मावक -5 दि. 30 जून 2006 सोबतच्या सुधारी नमुन्यात उपरोक्त प्रवर्गातील उमेदवारांनी वर्ष 2013-14 या कालावधीकरिता वैध असलेले अर्थात दि. 1/4/2013 पासून अथवा तदनंतर निर्गिमित केलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे  नॉनक्रीमीलेयर प्रमाणपत्र.
  7. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असलेले आरक्षण महिला व बालकल्याण विभाग शासन निर्णय क्र. 82/2001/म.से.अर- 200/प्र.क्र. 415/का. 2 दि. 22 मे 2001 आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आरक्षणाअंतर्गत अर्ज करणा-या महिला उमेदवारांनी वर्ष 2013-14 या कालावधीकरिता वैध असलेले अर्था त दि. 31/3/2014 पर्यत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉनक्रीमीलेयर प्रमाणपत्र.
  8. माजी सैनिक : - उमेदवारांनी माजी सैनिक असलेबाबत जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र व माजी सैनिकास दिलेल्या ताम्रपटाची साक्षांकित प्रत. वारस असलयास त्यांनी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केली असल्यास प्रमाणपत्र
  9. अंशकालिन :- अंशकालिन उमेदवारांनी सेवायोजन कार्यालयात किंवा रोजगार स्वयंरोजगार कार्यालयात अंशकालिन काम केल्याचे सक्षम प्राधिका-यांचे प्रमाणपत्र
  10. महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम 2005 अन्वये शासनाने गट अ,ब,क,ड मधील पदांचा सेवा प्रवेशासाठी एक आवश्यक अर्हता म्हणून विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
  11. गुणवत्ताधारक खेळाडू :- उमेदवार महाराष्ट्र ऑलिम्लिक असोसिएशन यांनी स्वत: अथवा महाराष्ट्र ऑलिम्लिक असोसिएशनशी संलग्न असलेल्या राज्य संघटनेने तसेच ज्या खेळाची नोंदणीकृत राज्य संघटना त्यांच्या अधिकृत राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असेल तसेच सदर राष्ट्रीय संघटनेला इंडियन ऑलिम्लिक असोसिएशनने संलग्नता दिलेली आहे अशा संघटनेनी आयोजित केलेल्या त्या त्या खेळांच्या वैयक्त्‍िाक अथवा सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये किमान राज्य अजिंक्यपद स्पर्धांत किंवा भारतीय खेळ प्राधिकरणाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय व राज्य स्तरावरील ग्रामीणव महिला स्पर्धांत किंवा भारतीय शालेय खेळ महासंघ यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय व राज्य स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धांत प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान प्राप्त करणारा किंवा सुवर्ण् , रौप्य किंवा कांस्य पदक प्राप्त करणारा आहे.
  12. प्रकल्पग्रस्त उमेदवार : ज्या प्रकल्पान्वये उमेदवार प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित असेल त्याबाबतचा जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र
  13. टंकलेखन :- शासकीय किंवा राज्यशासन मान्यता प्राप्त संस्थेमार्फत टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिकासह प्रमाणपत्र.
  14. संगणक /माहिती तंत्रज्ञान :- शासन निर्णय क्र. मांतस-2012/प्र.क्र. 277/39 दि. 4 /2/2013 मध्ये नमूद संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक अर्हता प्राप्त परीक्षेचे प्रमाणपत्र
  15. शासकीय कर्मचारी :- उमेदवारांनी ते सध्या कार्यरत असणा-या कार्यालयामधील वर्ग 1/ वर्ग 2 दजांच्या अधिका-याकडून त्यांचे सेवाविषयक म.ना.से. (वर्तणूक) 19 अन्वये वर्तणूकबाबत दाखला
  16. अपंग उमेदवार :- अपंग उमेदवारांनी अपंगत्वाचे प्रमाण दर्शविणारे जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैदयकीय मंडळाचे प्रमाणपत्र
  17. उमेदवारांचे दोन आयडेंटीटी आकाराचे दोन रंगीत फोटो.
  18. रोजगार सेवायोजन कार्यलयात नाव नोंदणी केली असल्यास नाव नोदणी कार्ड अथवा सक्षम पुरावा.

 

 

 

 

सदस्य सचिव
तथा 
कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे